तुझा दुःखावर प्रेम आहे
असा म्हणाली होतीस तू
म्हणून तर तुझावर प्रेम केलं, प्रिये
एक झांखं जोजवते आहेस;
या वेदनेचे कात मागे टाकून
निसटायचा हवं आहे तुला तिच्यातून
आकाशाची वीज पकडून
न सोडता जळत राहिलेल्या
अंगभर जखमा ल्यालेल्या
एका कविलाच दिसली होती
ती वेदना तुझ्या डोळ्यामध्ये
तुला नाहीच ओळखणार हे लोक
तुझा कपाळावरचा घावाला
कुंकवाचा टिळा समजणारे
आणि व्हांत्या जखमेला
रक्तचंदनाची उटी
आपल्या जखमेसाठी
तेल मागत फिरणाऱ्या या अश्वत्थामाला
म्हणून दार बंद करू नकोस
नाही म्हणून नकोस,
कारण तुझ्या हि जखमेत
तोच तेल घालणार आहे
Comments
Post a Comment